Home साहित्य कुणाचे काय चुकले ?

कुणाचे काय चुकले ?

0

आपले काय चुकले
पुस्तकातले अभ्यासक्रम शिकवले
जे शिकवायचे ते राहून गेले !
ते फक्त पदव्यांचे कागद घेऊन गेले
घडायचे घडवायचे राहून गेले
गुणांच्या स्पर्धेत सारे वाहून गेले..

आम्ही उत्तरे द्यायला शिकवले
प्रश्न निर्माण करायला नाही
आठवून साठवायला शिकवले
समस्यांचा शोध घ्यायला नाही
आमचे इथेच चुकले!
पण मला शोध घ्यायचाय
ट्रम्प न्येतनाहू यांना कुणी काय कसे शिकवले?
म्हणून हे असे झाले?

सगळ्या जगाला वेठीस धरून
हे जग बरबाद करायला निघाले
मी, आम्ही भोवती फिरणारा स्वार्थ
तुम्ही, आपण चा विचार वाटतो व्यर्थ
मिसाईल बॉम्ब करणाऱ्यांना
सगळ्या जगाचा विनाश
हेच जगण्याचे सार्थक मानणाऱ्यांना
कुणी शिकवले ?

मला शोध घ्यायचाय त्या शिक्षकांचा
ज्यांनी या राक्षसांना घडवले !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version