Home साहित्य कृष्ण सखी….

कृष्ण सखी….

0

तिला पहाताक्षणी
मन माझे वेडे हसले
ती श्वासात असताना
विसरायचे तिला कसे.

तिची भेट जणू परमेश्वराची इच्छा
माणसांच्या गर्दीत मी ही होता एकटा
अद्भुत, अतूट हे आमचे बंधन
अनेक वर्षांचे जणू ऋणानुबंध.

साधेपणा, समंजसपणा
स्वभावाचा तिच्या हा वेगळेपणा
न कोणता स्वार्थ, न ही अपेक्षा
सोबत असावी हीच एकमेव इच्छा.

न बोलता ही ती
खूप काही बोलून गेली
नजरेला नजर जेव्हा मिळाली
डोळ्यातून ती व्यक्त झाली.

हातात घेतला जेव्हा हात
अश्रूंना मिळाली मोकळी वाट
जेव्हा घेतले पहिले आलिंगन
क्षणात गेले सर्व दडपण.

गोड हसून दुःख लपवते
ही कला तिला छान जमते
भावनांना भाषा नसते
खऱ्या प्रेमाची ती परीक्षा असते.

सुंदर, तेजस्वी तिचे रूप
देते माझ्या जगण्याला हुरूप
अशी ही माझी सखी
कृष्णाची राधा जशी.

अशी की माझी सखी
कृष्णाची राधा जशी.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version