Home बातम्या कोरोना : योद्धा पत्रकार श्रीकांत काकतीकर

कोरोना : योद्धा पत्रकार श्रीकांत काकतीकर

0

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दुःख एका बाजूला. यातच आपल्या कुटुंबाला याची लागण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाला घ्यावी लागते आहे. आपल्या गमावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार तेवढे करावे हीच ईच्छा प्रत्येक कुटुंबाची असते.

पण या महामारीच्या भीतीने अनेक जण अंत्यसंस्कार करण्यास पुढे येणास दचकतात. अशा अत्यंत गंभीर प्रसंगी बेळगावातील आपल्या सर्वांच्या परिचयाचे पत्रकार व शहापूर मुक्तिधाम स्मशान भूमी सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत काकतीकर माणुसकीचा दूत म्हणून अश्या कुटुंबाच्या मदतीसाठी काम करत आहेत.

कोणताही गाजावाजा न करता एकटे श्रीकांतभाऊ ही सेवा एखाद्या पूजेसारखी करत आहेत. अंत्यसंस्कार वेळेत पार पाडावेत, अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना जागा उपलब्ध व्हावी, याच बरोबर महापालिकेचे सहकार्य नसताना केवळ स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत श्रीकांत भाऊंनी तेथे सॅनिटायझैशनची व्यवस्था केली आहे.

या स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार केले जात आहेत. आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे पाहून त्या परिसरात सॅनिटायझैशन कामाकडे लक्ष दिले आहे. स्मशानभूमीची स्वच्छता राहावी यासाठी स्वतः जातीने काळजी घेत आहेत.

अनेक लोक इच्छा असूनही त्यांच्या या कार्यात मदत करण्यास घाबरतात. परंतु स्वतःच्या जीवाची काळजी न करता अंत्यसंस्कार वेळेत पार पाडावे यासाठी रात्रदिवस श्रीकांत भाऊ करत असलेले काम नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आहे. देव त्यांना दिर्घआयुष्य देवो.

मी त्यांच्या कामा बद्दल ऐकलै होते पण काल प्रत्यक्ष त्यांचे काम पाहिले आणि चाट पडलो.

या महामारीत आपण अनेक लोक “घरी रहा “असे सोशल मीडिया वरून सल्ले देताने आम्ही पाहिले. तर कांही लोक घरातूनच काम करत आपली कमाई कशी सुरू राहील या साठी धडपडताने आम्ही पाहिले.
परंतु कोरोना कुटूंबातील आपण एक सदस्य बनून या महामारीत माणुसकीच्या योध्याच्या रुपात मी श्रीकांतभाऊला पाहिलं.

एरवी आम्हा ईतर समाजसेवकांवर लेख लिहीणाऱ्या श्रीकांतभाऊवर चार ओळी लिहीत त्यांच्या कार्याला माझा नमस्कार करावा असे वाटले. त्यांच्या सेवेला माझा शतशः प्रणाम.

– लेखन : नरेश पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version