Home बातम्या कोल्हापूर : काव्यमय संध्याकाळ !

कोल्हापूर : काव्यमय संध्याकाळ !

0

तमाम कविता प्रकारांचा, काव्य गीत गायन आणि साभिनय सादरीकरणांने नटलेला “विश्वविक्रमी” जागतिक एक पात्री काव्य नाट्यानुभव “कुटुंब रंगलंय काव्यात” नुकताच अनुभवण्याचा दुर्लभ योग आला.

स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादीत ह्या संस्थेने कोल्हापूर येथील टेंभे सभागृहात आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्व रसिक कान हृदयात आणून ऐकत होते, अचंबित होऊन पहात होते. प्रत्येक काव्य प्रकार मराठीची महती सांगणारा होता. एकाहून एक सुंदर सादरीकरण होते. रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन दाद देत होते. कार्यक्रम शेवटाकडे कसा आला कळलेच नाही. अर्थात वेळेचेही बंधन होतेच.
‘अभिजात मराठी ‘विषयी अत्यंत मार्मिक, पण जिव्हाळ्याचे,आत्मियतेचे भाष्य ऐकताना मराठी असल्याचा अभिमान वृध्दिंगत झाला.

माझी मैत्रिण उज्ज्वला आणि सेवानिवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक मा.देवेंद्र भुजबळ सर, यांच्या सहृदय सहकार्याने सलग सलग १५ तास ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रम करून लिम्का बुक मधे सन्मानित झालेल्या, थोर विभूती प्रा विसुभाऊ बापट यांना हा कार्यक्रम झाल्यावर भेटण्याचा अलभ्य लाभ मला झाला. त्यांच्या भेटीमुळे अत्यंत साध्या पण संपन्न व्यक्तिमत्त्वाची छान ओळख झाली. माझी काही पुस्तके त्यांना भेट देऊन मला खूप आनंद झाला.

या कार्यक्रमाच्या संयोजकांमध्ये माझी विद्यानिकेतन, कोल्हापूर येथील विद्यार्थिनी होती. सभागृहात मला पाहिल्यावर लगेचच सविनय भेटायला आली. कार्यक्रम संपल्यावर आम्ही पुन्हा एकदा भेटलो. तिचे कौतुक केले.या दुग्ध शर्करा योगाने आनंद द्विगुणित झाला.

— लेखन : रेखा दीक्षित. निवृत्त प्राचार्या, कोल्हापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version