Home साहित्य कौतुक भारतीय टीमचे..

कौतुक भारतीय टीमचे..

1

कौतुक भारतीय टीमचे..

वर्ल्ड क्रिकेट मध्ये सेमीफायनल जिंकलेल्या भारतीय संघास प्रेमपूर्वक अर्पण. या कवितेस महाराष्ट्रगीताची चाल आहे.

रसिक करिती मुजरा झुंजार चमूला
कडवी झुंज घेऊनि जो विजयी जाहला….

ठेवूनि मनी ईर्षा ती सतत जयाची
विजिगिषु लढवय्यासि साथ जनांची
देशप्रेम उसळू द्या स्वार्थ ना धरी
दावि जरा जगताला मनगटी जोरी
उत्कृष्ट खेळ करुनि राखी संघभावना..

एकात्म प्रतीक असे चमू भारतभूचा
विविध प्रांत,जाति,धर्म शोभत साचा
एकदिले मंत्र एक राष्ट्रभावना
रसिक करिती विजयाची सतत कामना
आकांक्षा विजयाची सार्थ यशाला….

हृदयाच्या पायघड्या रसिक घालिती
हर्षाने स्तुतिसुमने,धनही उधळिती
प्रेमाच्या कौतुकास ये मग भरती
खळखळ हास्याच्या नद्या वाहती
लाभो विजयश्री सदा हीच प्रार्थना…

स्वाती दामले

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version