Home साहित्य क्रोधाग्नी

क्रोधाग्नी

0

क्रोधाने ही पोळले ऋषीमुनी
जळाले जेथे रंक नी राजे
काय वर्णावी त्याची महती
तिन्ही जगात डंका वाजे !!

क्रोधाच्या अग्निकुंडात जो पडला
जळून त्याची राख झाली
शापच ठरतो अखेरीला
जो त्याच्या आहारी गेला !!

विवेक जेंव्हा माती खातो
तेंव्हाच क्रोध जन्मती
त्यावरती काय उतारा
शांतीचा मार्ग अनुसरा !!

मान,सन्मान समजेना काही
भडकता क्रोधाग्नीच्या ज्वाला
राखरांगोळी करुन टाकतो
भरल्या संसाराचा गाडा !!

साधुसंतांच्या वाणीचा
जर उपदेश धरला
शांती- सद्भाव वसे मनी
त्यानेच क्रोधाग्नीं जिंकला !!

राजाराम जाधव

– रचना : राजाराम जाधव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version