Home साहित्य गुणीजनांचा मेळा

गुणीजनांचा मेळा

0

आपल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ पोर्टल चे ठाणे येथील स्नेहमिलन श्री हेमंत व सौ मेघना साने यांच्या घरी नुकतेच अतिशय सुंदर झाले.या स्नेहमिलनावर केलेली ही समर्पक कविता…
– संपादक

गुणीजनांचा तो सोहळा
भाग्य लाभले की मला
तिन्ही सांजेच्या वेळेला
सहवास मिळाला आपुला

देवेंद्रदा तव आगळी शान
कार्य करीसी किती महान
साथ अलकाची ह्या जीवनात
न्युज स्टोरी टुडे आहे तेजात

कर्करोग विषय नाजुक नी अतिगहन विषय
हाताळला सुलभतेने हसतमुखी सुलोचन
मुलाखतीद्वारा तिच्या झाले सर्वां ज्ञानार्जन
देण्या लढा कर्करोगाशी करु चिंतन मनन

मेघना ताईंची आगळीच हो प्रभा
थोरजनांची स्वगृही जमवली ही सभा
आकाशवाणी दूरचित्रवाणीचा सुंदरसा गाभा
प्रकाशमय अन् लोभसशी ही आभा

गवसल्या किती छान छान मज सया
आपुलकी अन् दावतीही त्या किती माया
एक जाळीदार सुबक सुंदरसे पिंपळपान
छान आठवणींच्या ह्या होईल मग साठवण

— रचना : नेहा हजारे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version