Home साहित्य ‘चित्रसफर’ ( ८ )

‘चित्रसफर’ ( ८ )

2

ग्रेट किशोरदा
देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांना किशोरदा ने बेस्ट आवाज दिला. माझ्या मते किशोरदा हा एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट पण होता हे फार लोकांना माहीत नाही. अगदी शेवटच्या वेळी 1987 ला मिस्टर इंडियात अनिल कपूर ला “काटे नही कटते ला” इतका छान आवाज दिला जसे काही अनिल कपूर गातोय इतका अद्भुत होता.

किशोरदाने जसे देव आनंद ला ‘चुडी नही है मेरा दिल है’ किसका रस्ता देखे, राजेश साठी ‘मेरे सपनो की राणी’ ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘जिंदगी का सफर’, अमिताभ साठी ‘ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिना’, ‘पग घुंगरू बांध मीरा नाचती’ ही सर्व गाणी आपण ऐका.

प्रत्येकाला त्याने खास आवाज वापरला. त्यांचा अभिनय आपल्या गायकीत उतरवला. हीच तर त्याची खासियत होती जी इतरांना जमली नाही. म्हणून तर 1969 ते 1987 तो नंबर 1 होता.

पंडित भीमसेन जोशी एकदा म्हणाले होते की, किशोरदा क्लासिकल शिकले असते तर आम्हाला जास्त संधी मिळाली नसती. यावरून किशोरदा किती ग्रेट होता लक्षात येईल.

जितेंद्र च्या पद्ममालयाच्या तोहफा, मवाली, जस्टीस चौधरी, हिम्मतवाला, या सर्व चित्रपटांना दिलेले बप्पी लाहिरी चे संगीत आणि किशोरदा चा आवाज कधीही विसरता येणार नाही. तुम कितनी खूबसुरत हो ये मेरे दिल से पुछो, हे गीत किरण कुमार वर चित्रीत आहे. पण लक्षात राहतो तो किशोरकुमार ! त्याने सर्वानाच बेस्ट दिले. सुपरस्टार राजेश खन्ना चा सुवर्ण युग पाहिला आणि शेवटचे गाणे वक्त की आवाज चे आशा समवेत गुरू गुरू आजावो गुरू प्यार मे किती उत्साह आहे त्यात. नंतर परत कधीच असा गायक झाला नाही. ग्रेट किशोरदा मिस यू….

संदीप भुजबळ

– लेखन : संदीप भुजबळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. 👍👍ग्रेट किशोरदा खरोखर किशोरदांची गाणी आजहि मनाला भूरळ घालतात .👍👍🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version