Home साहित्य चुली ग चुली

चुली ग चुली

1

गॅस सिलेंडर्स गायब
काय समस्या आली
प्रश्न गहन उद्भवला
आता कोण रे वाली

देशावरती आपत्ती
मदती आल्या चुली
आहो आम्ही सक्षम
भुकेवरी मारा फुली

चिंता ना करी मुळी
या अन्नपूर्णेच्या मुली
तोडगा त्वरित काढे
संकट आहे मामुली

जुने ते सोने म्हणता
गोष्ट ही खरी झाली
संस्कृतीचं सार्थश्रेष्ठ
पुनश्च प्रचिती आली

चुलीवरचा स्वयंपाक
चविष्ट भोजन थाली
प्रगति मस्ती उतरली
अहंकार येता खाली

विस्तव वास्तव सांगे
अग्नीची कृपा भली
भुकाग्नी शांतवायला
चूल माऊली धावली

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. हेमंत मुश्यांरीफ यांची चुली ग चुली ही खूप छान कविता वाचली. सध्याच्या अवघड परिस्थितीत आपल्या जुन्या स्वयंपाकाच्या पद्धतीकडे वळायची वेळ आली आहे. अर्थातच चुलीवरचा स्वयंपाक फार खमंग असतो.
    त्यांनी मांडलेले सकारात्मक विचार *समस्या लहानच आहे त्याला आपण सर्वजण तोंड देऊया* स्वागतार्ह आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version