Home Uncategorized जमाखर्च

जमाखर्च

0

!!2023!!
थोडं पुढे…थोडं मागे…

स्वतःलाच चाचपडत पाहू…
काय ग काय केलं तू…

2022 ला ..आठवतं का..
कुठे गेली होती का फिरायला..

काही सुंदर आठवणी…
आहेत का जपणाऱ्या..

कुणा कुणाला आनंद दिला…
कुणाला दिले का…
आपुलकीचे, विश्वासाचे बोल..

अडीअडचणीत केली का
कुणाला मदत
बघ ना…

नाही ना ..?
केली कुणावर चिडचिड, रागराग..
आठव ग सारं…

नक्कीच अवलोकन करायचं…
तसं रोजच मनातल्या कप्प्यात..
शिरून बघायचं असतं..

पण आज तर हवंच…करायला..
तर मग पूर्ण वर्ष आली का फिरून

चांगल्या गोष्टी बद्दल
कर धन्यवाद..

काही केल्या असतील चूका…
तर मनातच का होई ना ..
माफी माग..

दूखवलं असेल कुणाला तर
अगदी मनापासून..
क्षमा माग..

मनातल्याच परमेश्वराशी…
प्रामाणिक राहू या…

सुखदुःख, यश, अपयश,
मान, अपमान, क्लेश, त्रास होणारच
पण मन स्वच्छ, निर्मळ, आनंदी
तर जीवन पण किती छान

नवीन वर्षाचा
नविन संकल्प

स्वतःच स्वतःच अवलोकन
करत रोजचा नविन दिवस
आनंदमय आरोग्यमय
दिलखुलास जगायचं

पूर्णिमा शेंडे.

– रचना : पूर्णिमानंद
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version