Home बातम्या “जिचं तिचं आकाश” दूरदर्शन वर !

“जिचं तिचं आकाश” दूरदर्शन वर !

3

अमेरिकेत आणि भारतात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा असणार्‍या चित्रा मेहेंदळे लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित “जिचं तिचं आकाश” ह्या पुस्तकाच्या शानदार सोहोळ्याचा वृत्तांत दूरदर्शनच्या “आमची मुंबई” ह्या कार्यक्रमात बुधवार, 25 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता तर पुनःप्रसारण गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता होईल.

ह्या वृत्तांतात कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणाबरोबरच पुस्तकाच्या लेखिका चित्रा मेहेंदळे, संपादक देवेंद्र भुजबळ, एक कथा नायिका तथा दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका दिपाली केळकर आणि प्रकाशिका अलका भुजबळ ह्यांची मनोगते देखील प्रसारित करण्यात येणार आहेत.

ह्या वृत्तांताचे चित्रीकरण सिद्धेश जाधव यांनी, संकलन श्री गौरव जाधव यांनी तर सूत्रसंचालन तन्वी बर्वे ह्यांनी केले असून कार्यक्रमाचे सहायक निर्माते श्री संजय झनके, निर्माते श्री दीपक शर्मा तर कार्यकारी निर्माते श्री राजेश दळवी आहेत.

— टीम एनएसटी. ☎️ +91 9869484800

3 COMMENTS

  1. चित्राताई, श्री आणि सौ भुजबळ,
    मनःपूर्वक अभिनंदन .
    जिचं तिचं आकाश पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम उद्या दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे ही बातमी वाचली. खूप आनंद झाला.
    कार्यक्रम नक्कीच पाहणार आहे .
    शुभैषी,
    वेदवती कुलकर्णी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version