सध्या वादळ, मुसळधार पाऊस जोरात सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडत आहेत. क्वचित प्रसंगी एरवीही इतर कारणांमुळे झाडे पडतात.
कोणत्याही कारणानी का होईना, झाडे का पडतात ?
याचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक श्री विजयकुमार कट्टी हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “Tree Failure Forensic Research Initiative” विकसित करीत आहे. त्यांच्या या संशोधनासाठी, पडलेल्या झाडांची आपण काढलेली छायाचित्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपण पडलेल्या झाडाची वेगवेगळ्या कोनांतून काढलेली सर्व छायाचित्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन श्री कट्टी यांनी केले आहे.
कृपया शक्य असल्यास खालील प्रकारची छायाचित्रे पाठवा :
✅ संपूर्ण झाड
✅ मुळांचा भाग (Root Plate)
✅ खोड (Trunk)
✅ तुटलेला भाग (Fracture Point)
✅ फांद्या व शेंडा (Canopy)
✅ पडलेली जागा व आजूबाजूचा परिसर
✅ विविध कोनांतून घेतलेली छायाचित्रे
✅ प्रकाशित किंवा अप्रकाशित सर्व छायाचित्रे
🔬आपण पाठवलेले प्रत्येक छायाचित्र पुढील बाबी समजून घेण्यास मदत करेल :
🌱 झाड पडण्याची संभाव्य कारणे
🌱 मुळांची पकड व स्थिरता
🌱 खोडातील किंवा मुळांतील कुज (Decay)
🌱 संरचनात्मक दोष
🌱 भविष्यातील अपघात टाळण्यासाठी वैज्ञानिक उपाय
🤝 आपल्या एका योगदानातून नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि शास्त्राधारित वृक्ष व्यवस्थापनाला मोठी मदत होऊ शकते.

📲 छायाचित्रे पाठविण्यासाठी संपर्क : श्री विजयकुमार कट्टी
🌿 संस्थापक – VesacIndia
📱 +91 7977513822
🧠 AI आधारित Tree Failure Forensic Research Initiative आपल्या सहकार्याची मनःपूर्वक अपेक्षा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800