Home साहित्य जीवनाचा मंत्र

जीवनाचा मंत्र

1

प्रा सुरेश पुरी सरांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवन सार सांगणारी कविता पुढे देत आहे. आपण सर्व तसेच जगण्याचा प्रयत्न करू या. सराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

जीवन आहे एक पर्वणी
परमेश्वराने दिलेली
सोनेरी संधी

आज आहे उद्या नसू
त्याआधी थोडे
तरी जगू

थोडा वेळ देऊ
आपल्या माणसांची
सोबत घेऊ

नवा दिवस, नवा अनुभव
नाविन्याचा हा
अंधुक दव

अंधारात शोधू
आशेची वाट
प्रयत्नात शक्ती असे दाट

जन्म मरणा मधील हा पूल
जगू होऊन
लहान मूल

प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास
चला करू तो
एकदम खास

अनेक आठवणींचा
तो साठा
प्रेमाने सर्वांसोबत वाटा

वाईट अनुभव
मनातून खोडा
उद्याची चिंता आता सोडा

आजचा दिवस असे आपला
ईश्वराचे आभार माना
दिलखुलास जगा

खळखळून हसा व हसवा
सोडून सर्व
मनातील रुसवा

जाताना नको
कोणताही खंत
हा आनंदी जीवनाचा मंत्र.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️ 9869484800.

1 COMMENT

  1. वा खूपच छान रचना, “जाताना नको कोणताही खंत” 👌👌 अप्रतिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version