किती काळ जगलो ?
नच विचार करावा,
कसे आयुष्य जगलो ?
याचा हिशोब असावा.
जेव्हा समजेल तेव्हा,
जीवनाची परिभाषा
इतरांच्या दुःखामध्ये
पेरा जगण्याची आशा…
कर्म असावं सुंदर,
खरं, निर्मळ, निस्वार्थ !
उंच शिखरी जाताना,
हवा काहीतरी अर्थ…..
करा दुःखीतांची सेवा,.
तोच परमार्थ खरा!
भासे जीवन सुंदर,
सोडा मीपणा हा सारा.
आयुष्याचा चित्रपट,
जणू आत्ताच घडला !
डोळ्या आसवं ठेऊन,.
अलगद विसावला….
आठवणी नेहमीच,
हृदयात असतात!
कधी सुख कधी दुःख,
तव देऊनी जातात..
अचानक एक क्षण,
गेला आघात देऊन !
नाही तरीही खचले,
मार्ग काढला शोधून..
चित्रपट तरळला,
जेव्हा गेला जोडीदार
छंद शिकवून गेला,
कवितेचा हळुवार
भव्यदिव्य समूहात,
आनंदात रहायचे,
आयुष्याच्या पुस्तकात
हेच तर शिकायचे.
— रचना : वाणी वेणूमाधव केरकलमट्टी. डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
