जागतिक कुटुंब दिनाच्या
निमित्त काव्य लेखन….
तीन पिढ्या नांदती
प्रेमभावे नाते जपती
जीवनी आनंद शोधती
तेथे देवी प्रेमे वसती…1
एकमेकांची घेतात
काळजी मनापासून
नाते घट्टच करतात
जीवापाड गे जपून…2
संस्काराचे बीज रुजते
शिदोरी सर्वांना मिळते
स्नेह बंधनाने उमजते
जगण्याचे मोल कळते…3
आत्मीयतेने घरासाठी
मनस्वी बंध प्रेमे जपावे
घरचं हो प्रत्येका साठी
मंदिरा सारखे भासावे… 4
सहभागी सुखदुःखात
होऊन ऋणात राहावे
आनंदाचे रोजच घरात
कारंजे गे नित्य वाहावे…. 5
— रचना : मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
