Home बातम्या ठाणे : विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

ठाणे : विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

0

भारत सरकारच्या कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून नवे उद्योजक निर्माण करणे हे ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयाचे धोरण आहे.

यानुसार या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख डॉ. दीपक साबळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अर्थशास्त्र विभागातर्फे कला शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या 200 विद्यार्थ्यांच्या औद्योगिक भेटीचे आयोजन विरार येथील अमुल दूध डेअरी येथे नुकतेच करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय जिज्ञासपूर्वक संपूर्ण दुग्ध व्यवसायाची पाहणी केली. यामध्ये दूध संकलन, साठवणूक, बटर, चीज तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटींग , प्रसार करणे , बाजारपेठ निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टींचे बारकावे विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.दीपक साबळे म्हणाले, “आजचे शिक्षण हे चार भिंतीच्या बाहेर पडले आहे. व्यवहारात शिक्षणाचा उपयोग व्हावा हे आमच्या प्राचार्यांचे ध्येय असून आम्ही अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक उद्योजक निर्माण करणे हे आमचे ध्येय असून नोकरी शोधणाऱ्या तरुणांपेक्षा नोकरी निर्माण करणाऱ्या तरुणांची देशाला आणि समाजाला जास्त गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांची ही औद्योगिक भेट खऱ्या अर्थाने उद्योजक घडविणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात असेल असा मला विश्वास वाटतो.”

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version