Home कला “तुम्हे याद करते है”

“तुम्हे याद करते है”

0

प्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर जयकिशन यांच्या पैकी शंकर यांची 36 वी पुण्यतिथी काल झाली. या निमित्ताने या जोडीला आदरांजली अर्पण करणारा “तुम्हे याद करते है” हा बहारदार संगीत, चित्रपट रस ग्रहणारा सुरेल कार्यक्रम काल चेंबूर येथील बालविकास संस्थेच्या
सभागृहात दर्दी रसिकांच्या उपस्थितीत चांगलाच रंगला.

चित्रपट अभ्यासक, लेखक प्रा कृष्णकुमार गावंड यांनी शंकर जयकिशन यांची निवडक गीते प्रत्यक्षात मोठ्या पडद्यावर सादर करून, त्या त्या गाण्यातील सौंदर्य स्थळे अतिशय रसाळ पणें उलगडून दाखवली. प्रसंगी त्या त्या गाण्याशी संबधित इतर बाबी ही त्यांनी रंजकपणे कथन केल्या.

सुरुवातीलाच राज कपूर यांना सलाम करून प्रा गावंड यांनी “जिस देश में गंगा बहती है” या चित्रपटाचे टायटल साँग किती सुंदरपणे लिहिल्या गेले, त्याचे संगीत, चित्रीकरण या विषयी विवेचन करून राज कपूर यांनी शंकर जयकिशन या दोघांना संधी दिल्याने पुढे इतिहास घडला, असे प्रतिपादन केले.

शंकर जयकिशन हे दोघेही काळानुसार बदलत गेले आणि त्यांनी दर्जा कायम राखला म्हणून ते यशस्वी झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अनेक कलाकार, गीतकार, संगीतकार हे सुरुवातीच्या काळात काही ना काही नोकरी करत, हे सांगताना प्रा गावंड यांनी गीतकार हसरत जयपुरी हे बेस्ट मध्ये कंडक्टर असताना त्यांनी सुंदर तरुणी कडून कधी तिकीटाचे पैसे घेतले नाही, ईश्वराने इतके सौंदर्य घडविले, त्यांचे तिकीट काय घ्यायचे ? हे सांगणारी हसरत जयपुरी यांची मुलाखत दाखवली.

प्रा गावंड त्यांच्या शैलीत, मधूनच रसिकांना प्रश्न विचारून त्यांना बोलते करत. त्यामुळे हा कार्यक्रम चैतन्यदायी झाला.

या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळणारे लेखक गीतकार विवेक पुणतांबेकर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, संगम मधील गाण्यांवर
लोकसंगीताचा विशेष प्रभाव आहे. तसेच परदेशात चित्रीकरण झालेला तो पहिला हिंदी चित्रपट ठरला.

प्रारंभी स्वाती वैद्य यांनी प्रास्ताविक करून बालविकास संस्थेची वाटचाल, उपक्रम यांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.

प्रा गावंड त्यांच्या शैलीत, मधूनच रसिकांना प्रश्न विचारून त्यांना बोलते करत. त्यामुळे हा कार्यक्रम चांगलाच चैतन्यदायी झाला.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version