“जस्संच्या तस्सं”
मंडळी,
जस्संच्या तस्सं ही कविता “Georgia O’Keeffe” यांनी काढलेल्या “Abstraction Blue” ह्या पेंटिंगच्या मूळ गाभ्यावर आधारित आहे. ह्या चित्रात “Juxtaposition” किंवा परस्परविरोधी स्वरूपात मांडलेल्या रंगाच्या द्वंद्वाचा भास होतो. आणि Yin आणि Yang ह्या चिनी तत्त्वज्ञानातील विचारांच्या विरोधाभासांचं चित्रण केलं आहे असं मला वाटतं.
म्हणूनच मी इथे सादर करत आहे दोन कविता – पहिली कविता ही हलकी आणि गतिमान आहे. ती “Yang” आणि “Nostalgia” दर्शवते. ती खेळकर पद्धतीने भूतकाळातल्या गोष्टी शोधते. त्यात दु:खाची छाया नाही, तर एक प्रकारची स्वीकार्यता आहे.
तर माझं उत्तर हे “Yin” आहे – अंतर्मुख, स्थिर, गहिरं. पण त्या उत्तरांमध्ये असहायता आणि अपरिहार्यता आहे. शेवटी, सर्वांना सर्व काही कधीच मिळत नाही. आठवणींना उजाळा देत, त्यांच्याशी जुळवत, पुढे जात राहणं – एवढंच खरं हे त्यातून तुम्हाला जाणवेल अशी मला आशा आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
