Home बातम्या दिवाळी: असाही सहयोग !

दिवाळी: असाही सहयोग !

0

प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार आपापले सण साजरे करीत असतो. नुकताच दिवाळी सण साजरा करण्यात आला. तत्पूर्वी केलेल्या निवेदनात असे आवाहन करण्यात आले होते की,आपण आपली दिवाळी साजरी करताना, समाजातील
वंचित बंधू भगिनींचीही अवश्य आठवण ठेवा.

अशी आठवण पुण्याजवळील निगडी येथील सहयोग फाऊंडेशनने ठेवून वनवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप केले.

हिंजवडी आय टी पार्क पासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या टेमघर धरणाजवळ लव्हार्डे, आंदगाव, वातुंडे, भोडे, वांजळे हा भाग दुर्गम असून तेथील नागरिकांना अद्यापही दिवाळीचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे तिथे जाऊन तिथल्या लोकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून, यमुनानगर सहयोग फाऊंडेशनच्या वतीने तिथल्या लोकांना फराळ, महिलांना साड्या, आकाशकंदील यांचे वाटप करण्यात आले.

दिवाळीत आपण एकटेच फराळाचा आस्वाद का घ्यावा, सर्वाना वाटून खाण्यात एक वेगळाच आनंद आहे, तो योग दिवाळीच्या पूर्वसंध्येला साधण्यात आला.

सहयोग फाउंडेशन हा उपक्रम गेली अठरा वर्षे राबवत आहे. समाजात समरसता आणण्याच्या प्रयत्नाने हा उपक्रम राबवला जातो. प्रत्येक वर्षी एका वेगळ्या दुर्गम ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून, त्यांना फराळ वाटप केला जातो.
ह्या उपक्रमासाठी यमुनानगर मधील नागरिकांकडून सहयोग फाउंडेशन ला चांगला सहयोग मिळतो. हे नागरीक स्वतः जाऊन त्या भागास भेट देतात व उपक्रम राबवतात.

या उपक्रमात नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी, धनाजी शिंदे, अनिल अढी, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री गजानन ढमाले, अजय म्हाळस, दिनेश कुलकर्णी सर, अशोक वाळके पाटील, विकास देशपांडे, आदित्य कुलकर्णी, जगदीश साबळे, गिरीष देशमुख, सोमनाथ काळभोर, चि आर्यन व प्रशांत बाराथे, श्री शनैश्वर प्रतिष्ठानचे श्री गोपाळ शेठ मुरकुटे, केशव पवळे, गिरीश भोकरे सहभागी होते.

— लेखन : बाबू डिसूझा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version