Home बातम्या शब्दांच्या वाटेवर….

शब्दांच्या वाटेवर….

0

नमस्कार मंडळी.
भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या “शब्दांच्या वाटेवर”, या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात सहभागी होण्यासाठी मी काल वरळी येथील दूरदर्शन केंद्रात दाखल झालो.

बरोबर चाळीस वर्षांपूर्वी मी दूरदर्शनच्या सेवेत रुजू झालो होतो. या सेवेमुळे मला खूप मान, सन्मान, आर्थिक, कौटुंबिक स्थैर्य दिले. जवळपास पावणे सहा वर्षे दूरदर्शनमध्ये राहून पुढे मी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत गेलो तरी अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने माझा दूरदर्शनशी संबंध कायम राहिला.

दूरदर्शन केंद्रात पोहोचता क्षणीच स्टुडिओच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी यांनी अत्यंत आत्मियतेने, हसतमुखाने माझे स्वागत केले. बोलता बोलता अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

कॉफी पान करून मेकअप करून घेतला. मुलाखतकार पूनम चांदोरकर यांची भेट मेकअप रूम मध्ये झाली. तिथे कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा झाली.

स्टुडिओत पोहोचल्यावर काही जुने सहकारी भेटले. त्यांना पाहून आनंद झाला. पुढे स्थानापन्न झाल्यावर आवाजाच्या आणि ईतर काही तांत्रिक चाचण्या होऊन प्रत्यक्ष मुलाखतीचे चित्रीकरण सुरू झाले.

मी संपादन केलेली पुस्तके…

मुलाखतकार पूनम चांदोरकर यांनी चांगले प्रश्न काढले होते. त्यामुळे मला वाचनाची आवड कशी लागली, शब्दांच्या वाटेवर मी कसा वळलो, माझ्या लिखाणामागची प्रेरणा, www.newsstorytoday.com या पोर्टलची निर्मिती, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपात कशा प्रकाशित झाल्या, अन्य पुस्तकांचे संपादन, प्रकाशन अशी खूप छान, समाधानकारक मुलाखत झाली.

मी लिहिलेली पुस्तके

मुलाखतीच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ आपल्याला कळवेनच.

केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी, निर्माते श्री दीपक शर्मा, सहायक निर्माते श्री संजय झनके, अन्य तंत्रज्ञ, सहकारी आणि मुलाखतकार पूनम चांदोरकर या सर्वांचे मनापासून आभार.

आपला स्नेहांकित,

— देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version