Home साहित्य ध्यानावस्था

ध्यानावस्था

1

शांत मनाचे सूर निरागस
घुमू लागले माझ्या कानी
जाग येवुनी दोन्ही डोळे
पाहु लागले अंतर्यामी

अंतर्मुखही झाली जिव्हा
रमून गेली नामस्मरणी
तनमन अवघे एकरूप हे
श्वासामधल्या ओंकारानी

देवापाशी दिप तेवता
तेजाची ती ज्योत-आरती
निळसर-धुसर प्रकाश-वलये
पसरू लागली देहाभवती

माझा आता मी नच उरलो
गळून गेले सारे मी-पण
आत्म्याचे जणु परमात्म्याशी
आज जाहले सुंदर मिलन

— रचना : सुरेश शेठ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version