Home साहित्य नविन इयत्ता

नविन इयत्ता

0

आता आपली नविन इयत्ता
नविन admission
नविन उत्सुकता.

चला नविन इयत्तेत
येऊन एक वर्ष झाले..
विचारताय कसे वाटतेय…?
कसा आहे हा अभ्यासक्रम
कसा आहे हा नविन..
Syllabus…

काही धडे करावे लागतात पाठ
दोन तीन धडे हवेच पाठ
नाहीतर रहावे लागेल भिंतीकडे
उलटे करून पाठ.

पण खरं सांगू का ?
छान वाटतंय या इयत्तेत
ना होमवर्क
ना कुठली स्पर्धा…

आपणच आपला निवडायचा
Subject
आणि आपणच आपलं
व्हायचं perfect

किती छान आहे ना
ही अफलातून कल्पना.

No rank,No grade
नापास नाही व्हायचं हं
हसत, खेळत, आनंदात
पास तरं व्हायचचं हं

Absentee not allowed
but Presenty is compulsory.

नविन student हवे ना भेटायला
मग आपल्याला नको का मग यायला.

दोन तीन आहेत पाठ
करायचे आहेत इथे…पाठ
एक जीभ आहेत त्याला
…दोन धडे
म्हणजे जास्त बोलायचं
नाही हा पहिला धडा
आणि जास्त खायचं नाही
हा दुसरा धडा.
दोन्ही धडे पाठ पाहिजे.

दुसरा मोठा धडा
नाकाला एकदम साधा
इथतिथं नाक
खुपसायचं नाही
उगीच उपदेशाचे डोस
पाजायचे नाही.
आपण बरं आपला
अभ्यास बरा…बरं का?

अजून एकच छोटासा
कठीण आहे धडा
आपल्या साठी आहे हा भला.

जपूनच पाऊलं टाकायची.
चुकूनही चुकीचं पाऊल
नाही हं टाकायची. मग,
नजर हटी दुर्घटना घटीच.

मग या इयत्तेत..येताय म्हणता
याच ना…
हो, या इयत्तेत वयाची अट तर हवीच
फक्त वय पूर्ण हवे साठ…
पाठ, मान एकदम ताठ
सगळे धडे, सोपे पाठ…
जेष्ठ श्रेष्ठ सगळ्याचाच
काय मग एकदम थाट

नविन इयत्तेत येऊन बघाल…
मजा, मस्ती आणि धमाल…
नविन शाळा, नविन शाळा
मस्ती की पाठशाला…
मस्ती की पाठशाला…

पूर्णिमा शेंडे.

– रचना : पूर्णिमानंद. मुंबई.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version