Home बातम्या नेदरलँड्स : योग दिन साजरा

नेदरलँड्स : योग दिन साजरा

0

आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणादरम्यान मांडली होती.

भारताने सादर केलेल्या मसुद्याला 177 देशांनी पाठिंबा दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघाने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. परिणामी, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

हेग, नेदरलँड्स येथील भारतीय दूतावासाने रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भारतीय दूतावासाने प्रतिष्ठित अँट्रियम सिटी हॉल, द हेग येथे आयोजित केलेल्या योग सत्रात मोठ्या संख्येने योगप्रेमी सहभागी झाले.

डच सशस्त्र सेना, योग उत्साही आणि हेग शहरातील सुमारे 10 योग शाळा आणि संस्थांसह विविध क्षेत्रातील लोकांनी #IDY2022 कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी दूतावासाशी भागीदारी केली.

महामहिम राजदूत, रिनत संधू यांनी हेगमधील एट्रिअम सिटी हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या योगप्रेमींचे स्वागत केले.

हेग येथील एट्रिअम सिटी हॉलमध्ये दीपप्रज्वलन करून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याचे उद्घाटन डच मान्यवरांसह राजदूतांनी केले.

समारंभाचा एक भाग म्हणून एक सामान्य योग प्रोटोकॉल सत्र आयोजित केले गेले, ज्यात उपस्थितांनी उत्साहाने भाग घेतला.

प्रणिता देशपांडे.

– लेखन : प्रणिता देशपांडे. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version