Home साहित्य पहिला पाऊस मृगाचा

पहिला पाऊस मृगाचा

0

कधीकाळी डोळ्यात साचलेला
तापलेल्या भुईवर कधी पडलेला

पाऊस डोळ्यासमोर कोसळलेला
नदी माईला तुडुंब पूर आलेला

शाळेत जायच्या वेळी भिजविणारा
सर्दी पडसे खोकला ताप देणारा

पहिला पाऊस मृगाचा मृग किड्यांचा
डराव डराव रात्रभर ओरडत बेडकांचा

पहिला पाऊस भेगाळल्या धरेचा
कधी रात्री अपरात्री संतत धारेचा

कुट्ट काळोखात लखलख काजव्यांचा
विजेचा झंकार करीत शीव तांडवाचा

नववधूच्या आगमनी ओल्या हळदीचा
चिंब चिंब भिजून लग्नातील देहांचा

डबकी तळी नदी धबधबे भरणारा
गार गार गारवा गीत गात जाणारा

माधवी ढवळे

– रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version