Home साहित्य पाऊस : काही कविता

पाऊस : काही कविता

0

१. पाऊस
तो पाऊस, तो वारा
येतो अंगावर शहारा

गडगणारे ढग, कडकडणारी वीज
खुनवती पावसात मनसोक्त भीज

मोराचा नाच, कोळीचेच गान
क्षणात घालवतो जीवनातील ताण

ते धुके, तो अंधार
निसर्ग करतो सुंदर शृंगार

अखंड वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे
अडोशाला लपलेले पक्षांचे थवे

ऊन पावसाचा हा लपंडाव
ओळख माझ्या मनातील भाव

अदृश्य सोनेरी सूर्याची किरणे
मनोसक्त बाहेर सखी सोबत फिरणे

अंधारलेली ती काळोखी वाट
नटलेला तो गडद घाट

गाडीत लागलेली प्रेमाची गाणी
सोबतीला ती माझी प्रिय राणी

ती थंडी, तो गरमागरम चहा
थरथरनारा तो तिचा हात पहा

चल सखे पावसाच्या गावा
तिथे केवळ माझ्यासोबत तू रहा

पावसाने केली ही जादुई किमया
तिच्या विना आता करमेना

पाऊस तु पड आता रे खूप
बहरून आले तिचे ते रूप
बहरून आले तिचे ते रूप.

रश्मी हेडे

– रचना : रश्मी हेडे. सातारा.

२. पाऊस…
निसर्गाच्या सान्निध्याला पाऊस
तुला तेथे भिजवत होता
तेव्हा शहरातील पाऊस
मला मात्र खिजवत होता

खूप छान वाटतं
तुझ्याशी बोलताना
ग्रीष्माच्या काहिलीनंतर
जसं पावसात भिजताना

मला सारखं आठवतं
आपलं पावसातलं भिजणं
तुझ्या गालांवरुन निथळणारं
पाणी मी बोटांनी अलगद पुसणं

पावसाची होईल संततधार
त्यावेळी तू इथे नसणार
माझ्या मनीचे गूज
मी कुणाला सांगणार

– रचना : सुरेखा पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version