Home बातम्या ‘इत्थंभूत’ प्रकाशित

‘इत्थंभूत’ प्रकाशित

0

इंदूरचे ज्येष्ठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व श्रीकृष्ण बेडेकर यांच्या बहुविध कार्य-कर्तृत्त्वावर आधारित ‘इत्थंभूत‘ ग्रंथाचे दोन-सव्वादोन वर्ष खोळंबलेले प्रकाशन नुकतेच पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागारात ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या सहृदय सान्निंध्यात पार पडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सुरेश खरे यांनी श्रीकृष्ण बेडेकरांविषयी गौरवोद्गार काढत म्हटले, “बेडेकरांनी मराठीला ‘संतापकीय’, ‘स्वीकारक’ सारखे पाच-पन्नास नवे शब्द देवून जे कार्य केले ते पण भाषा संवर्धनच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.”

श्रीकृष्ण बेडेकर सत्कार समितीचे प्रमुख कार्यवाह डॉ.विवेक क्षीरसागर प्रास्ताविकात म्हणाले, “श्री.बेडेकर यांच्या अफाट कर्तृत्वाची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी या सद् हेतूने आम्ही श्रीकृष्ण बेडेकर सत्त्कार समिती स्थापन केली असून त्यांना अपवाद म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने अलंकृत करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.”

सत्त्कारमूर्ती बेडेकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

नंतर सुरेश खरे यांच्याहस्ते ‘इत्थंभूत‘ ग्रंथ प्रकाशित झाला व सन्मान चिंन्ह देवून खरे, बेडेकर व इतरांचा सत्त्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांनी बेडेकरांंना मानपत्र प्रदान केले. या अत्यंत सुरेख मानपत्राचे लेखन भालचंद्र गुजर यांनी, तर वाचन सौ.भाग्यश्री गोसावी यांनी केले.

डावीकडून पहिले शंभू गोडबोले, डॉ. क्षीरसागर,सुरेश खरे,श्रीकृष्ण बेडेकर व सौ. गीता बेडेकर

प्रकाशन सोहळ्याच्या अखेरीस पडद्यामागे राहून त्याला साकारणा-या श्री. मोहन कुलकर्णी(मनोरंजन) अन् श्रीहरि कुलकर्णी यांनाही सन्मान चिन्हं प्रदान करण्यात आली.
सौ. भाग्यश्री गोसावी यांनी सादर केलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

श्रोतृवृंदात कॉसमॉस बँकेचे डॉ.मुकुंदराव अभ्यंकर, सुहास गोखले, व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे,
डॉ. मंगेश कश्चप, श्याम भुर्के, सतीश पाकणीकर, रविप्रकाश कुलकर्णी आदी मंडळी होती.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version