Home कला पाककृती : झणझणीत म्हाद्या

पाककृती : झणझणीत म्हाद्या

5

आज पासून आपण दर शनिवारी काही पाककृती देणार आहोत.
आज पाहू या, सातार च्या झणझणीत म्हाद्या या पदार्थाची पाककृती….

साहित्य : –

दोन टेबलस्पून तेल
मोहरी
जिरे
कढीपत्ता
हिंग
हळद
कांदा लसूण मसाला/लाल मिरची पावडर
चार ते पाच लसूण पाकळ्या
२ मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून
२ चमचे लसूण खोबरं (optional)
१ १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीपुरतं मीठ
कोथिंबीर बारीक चिरून

कृती : –

कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक कट केलेला लसूण टाका. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये लसूण खोबरं घालून थोडसं परतून घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरची पावडर टाकून त्यातच पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद व चिमूटभर साखर टाकून थोडसं परतून घ्या. आता दीड वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून परतून घ्या. गरजेनुसार पाणी घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून एक उकळी येऊ द्यावी. आता बारीक कट केलेल्या कोथिंबीरी ने गार्निश करा आणि गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करा.

टीप :

एवढा म्हाद्या चार ते पाच जणांसाठी पुरेसा होतो.

रेसिपी लिंक
https://youtube.com/shorts/55c6WlMjqtY?feature=share

चैनल लिंक
https://youtube.com/@grahrajkitchen873

ममता कुंदप.

— लेखन : ममता कुंदप. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

5 COMMENTS

  1. खूपच छान म्हाद्द्या , गावातील मंडळीची आवडती भाजी ,सौ.ममता कुंदप सातारा ही माझी सून आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version