Home बातम्या प्रभाकर राऊत सन्मानित

प्रभाकर राऊत सन्मानित

0

पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथील सु. पे. ह. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा गोखले शिक्षण संस्थेचे पालघर जिल्हा विभागीय सचिव श्री. प्रभाकर राऊत यांचा संस्थेच्या वतीने नाशिक येथे झालेल्या संस्थेच्या १०८ वा वर्धापन दिन समारंभामध्ये माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा संस्थेच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष श्री आर पी देशपांडे, चेअरमन डॉ. सुहासिनी संत आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी ह्यांच्या उपस्थितीत पार पडला.

श्री. प्रभाकर राऊत यांना देण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराबरोबरच संस्थेच्या बोर्डी येथील सुनाबाई पेस्तनजी हकिमजी हायस्कुल तसेच महाविद्यालयास सन २०२५-२०२६ साठीचा प्रिन्सिपॉल टी.ए. कुलकर्णी गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांमुळे शिक्षण पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या बोर्डी गावाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना परिसरातिल असंख्य विद्यार्थी ; त्यांचे पालक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

अल्प परिचय : –
श्री. प्रभाकर राऊत वयाच्या ८४ व्या वर्षी आजही कार्यरत असुन आपले सहकारी मित्र व शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याने संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत.

श्री. प्रभाकर राऊत यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या सर्वंकश विकासाला गेली ६ दशके अविरतपणे वाहून घेतले आहे. आचार्य भिसे, चित्रे गुरुजी यांनी बोर्डी येथे सुरू केलेल्या शिक्षण अभियानावर आपल्या अविरत सेवेने कळस चढवुन संस्थेच्या विकासाला खर्‍या अर्थाने हातभार लाऊन समाजातील तळागाळातील जनतेला त्यांनी शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत.

बोर्डी आणि आजुबाजुच्या परिसरामधिल विद्यार्थी पूर्वी उच्च शिक्षणासाठी मुंबई- पुण्यामध्ये जात असत. प्रभाकर राऊत यांनी बोर्डी येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे पालघर जिल्ह्यातील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला आणि हजारो तरुण, तरुणीना पदवीच नाही तर पीएच.डी पर्यन्त शिक्षण घेण्याची सुविधा निर्माण झाली.

श्री.प्रभाकर राऊत यांना यापूर्वी शिक्षण क्षेत्रामधील विषेश योगदानाबद्द्ल महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version