Home Uncategorized फणसवाडी : बीजचेंडू, वृक्षारोपण संपन्न

फणसवाडी : बीजचेंडू, वृक्षारोपण संपन्न

0

रायगड जिल्ह्यातील नेरळ विद्या मंदिर विद्यालयाच्या वतीने नेरळ जवळील फणसवाडी येथे बीजचेंडू आणि वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत गोळा केलेल्या विविध प्रकारच्या फळांच्या बीजांची व नवीन रोपांची लागवड फणसवाडी येथील डोंगर परिसरात करण्यात आली.

विद्या मंदिर मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य तथा लेखक श्री दिलीप गडकरी यांनी नेरळ विद्या मंदिर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरणसंवर्धन विषयक मार्गदर्शन करताना बीजचेंडू ची अभिनव कल्पना शिक्षकांसमोर मांडली होती. विविध प्रकारच्या फळांच्या बिया गोळा करून त्या मातीत टाकून ओलसर मातीचे गोळे तयार करायचे व ते सुकवून डोंगर, माळरान अशा ठिकाणी नेऊन रोपण करावयाचे. याच बिया त्या ठिकाणी मातीत रुजून त्याची रोपे तयार होतात व वाढतात अशी ही सुंदर कल्पना होती.

विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद विचवे यांना ही कल्पना आवडली. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन केले व या बीजचेंडू उपक्रमाचे नियोजन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत बिया गोळा करून बीजचेंडू तयार करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

या नियोजनानुसार नेरळ शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या फणसवाडी येथील डोंगरात जाऊन विद्यार्थ्यानी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बीज चेंडू रोपण केले. तसेच आंबा, जांभूळ, नारळ, चिंच, पेरू अशी विविध रोपे लावली.

या उपक्रमात १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या सांस्कृतिक समिती प्रमुख, सौ लाड मॅडम, क्रीडा शिक्षक श्री जे के पारधी, सौ पी पी विशे, श्री एस एल सुतार, श्री वाय व्ही गेंगजे, श्री कृष्णा एच हाबळे, श्री एन एल वडणे, श्री ए एम वसावे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

प्राचार्य श्री प्रमोद बी विचवे उपप्राचार्य श्री एम के परदेशी, आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या अभिनव उपक्रमा बद्दल विद्या मंदिर शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन. या शाळेने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, असे उपक्रम सर्व शाळांनी हाती घेऊन आपली धरती हरित करण्यासाठी हातभार लावणे, ही काळाची गरज आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version