Home साहित्य फुले-आंबेडकर विचार शिक्षक संमेलन संपन्न

फुले-आंबेडकर विचार शिक्षक संमेलन संपन्न

0

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक अकादमीच्या वतीने धुळे शहरात नुकतेच दोन दिवसीय ‘दुसरे फुले-आंबेडकर विचार शिक्षक संमेलन‘ संपन्न झाले.

नागनाथ कोत्तापल्ले सभा मंच, राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिर, पारोळा रोड, धुळे येथे झालेल्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी भूषविले

संमेलनाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख यांच्या हस्ते झाले. आयोजक भास्कर अमृतसागर, प्रा.डॉक्टर प्रदीप आगलावे, डॉक्टर मिलिंद बागुल, जिल्हा कोषागार अध्यक्ष प्रवीण देवरे, श्री.रविंद्र खैरनार, राजू हाके आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलनाचे आयोजन केले गेले होते.

माधुरी काकडे यांना पुरस्कार
लोकसभेचे माजी उपाध्यक्ष सरदार चरणजितसिंग अटवाल यांच्या शुभहस्ते माधुरी काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 व माधुरी काकडे यांनी संपूर्ण पर्यावरणावर आधारित लिहिलेल्या ‘सृष्टीकाव्य’ या काव्यसंग्रहास महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, धुळ्याचे महापौर प्रवीण कर्पे, डॉ. प्रा. मिलिंद बागुल, राजू हाके आदी मान्यवर उपस्थित होते.

माधुरी काकडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version