Home साहित्य बरस रे पावसा

बरस रे पावसा

1

बरस रे पावसा माझ्या गावी
वाट पाहतोय शिवार सारा
पेरणी झाली पण नाही धारा
शेतकरी तुझा त्रस्त झाला !!

ओसाड वाटतोय सारा रान
तुजवीण कसे लागेल मन
एकदाचा तू बरसून जा
धरती मातेला तू भिजवून जा !!

वाट सारा बघतोय रान
तुझ्या शिवाय कसे येईल त्राण
हे मेघराजाच्या दुता एकदा
गर्जना करीत बरसून जा !!

का रे बाबा रूसलास कां ?
काय झाले ते तू तरी सांग
शेतकऱ्यांची तू पीडा जाण
पण एकदाचा तू बरसून जा !!

तुझ्या वरती भरोसा ठेवून
पेरले हजारो रूपयांचे वाण
तू जर असाच रूसुन बसला
तर साथ कोण देईल हे तू जाण !!

धोंडी धोंडी मागुन झाली
गा-हाणे घातले महादेवाला
तुझ्याकडे डोळे लावून बसले
आता एकदाचा तू बरसून जा !!

एकदाचा तू बरसून जा
एकदाचा तू बरसून जा !!

राजाराम जाधव

रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version