Home बातम्या बियांपासुन रोपनिर्मिती : विनामूल्य कार्यशाळा

बियांपासुन रोपनिर्मिती : विनामूल्य कार्यशाळा

0

मुंबई आणि आजूबाजूच्या येऊर, तुंगारेश्वर, आरे, कर्नाळा येथील जंगलात गेली तीन महिने ग्रीन अंब्रेलाच्या सदस्यांनी फिरून अनेक स्थानिक, देशी तसेच दुर्मिळ झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या बियांपासून ग्रीन अंब्रेलाच्या नर्सरीत रोपं तयार केली जाणार आहेत. या उपक्रमात अनेक वृक्ष प्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक सहभागी होत असतात. आपण सुद्धा या कार्यशाळेत सहभागी होऊन निसर्ग संवर्धनाच्या कामात मोलाचं योगदान देऊ शकता. ही कार्यशाळा हि विनामूल्य आहे.

या कार्यशाळेत विविध देशी झाडांच्या बियांची ओळख करून देण्यात येईल तसेच त्यांचा रूजण्याचा कालावधी, रूजवण्याची पद्धत, कोणती काळजी घ्यावी इत्यादी माहिती शिकता येईल.

ही कार्यशाळा रविवार, दिनांक 4 जुलै 2021 सकाळी   7 ते 11 या वेळेत असून भुईगाव नाका, पोलिस चौकीजवळ, वसई (पश्चिम) या ठिकाणी आहे. कार्यशाळेच्या ठिकाणी जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकाजवळून महानगरपालिका बस उपलब्ध आहे.

आपण येताना सोबत आणावयाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
1. पाण्याची बॉटल
2. स्वतःसाठी दुपारचे जेवण
3. कॅप व रेनकोट
4. सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे
5. मास्क लावणे अनिवार्य
6. ज्यांना घरी लावण्यासाठी रोप हवी असतील त्यांनी शक्य असल्यास कापडी पिशवी आणावी.

संस्थेकडून पुरविल्या जाणाऱ्या गोष्टी
1. पिण्यासाठी पाणी
2. आवश्यक असल्यास हॅण्डग्लोज
सदर कार्यशाळा हि विनामूल्य आहे.

नाव नोंदणी करता संपर्क
श्री कौस्तुभ चोपडेकर 9892819932
https://www.facebook.com/GreenUmbrellaorg/

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ग्रूपमधे खालील लिंक वर क्लिक करून सहभागी होऊ शकता.

https://chat.whatsapp.com/E1gxpC3ueR60BJUIJJWHTB

संस्थेचा परिचय

ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन ही भारतीय मूळ (देशी) वनस्पती, प्रजाती संवर्धन क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. भारतीय मूळाच्या वनस्पतींचे संरक्षण, प्रचार आणि प्रसार करणे हे ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

ही संस्था जैवविविधता संवर्धनासाठी उपयुक्त असणार्‍या तसेच वनक्षेत्रामध्ये कमी होत चाललेल्या असंख्य वनस्पती मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागातील उद्याने, मैदाने, गृहसंकुल, शाळा, कंपन्या इत्यादी ठिकाणी लागवड करून शहरातील प्रजातींचा जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहे.

या संस्थेची देशी वृक्षांची रोपवाटिकेत तयार झालेली रोपं अनेक संस्था, निसर्गप्रेमी नागरिक, शाळा यांना अल्प दरात मिळत असतात. ही रोपवाटिका वसई, जि. पालघर येथे आहे.

–  लेखन : दिशा खातू.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version