Home साहित्य भिजली वसुंधरा

भिजली वसुंधरा

2

सर सर सर सर धावत आली
सर पावसाची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोंगराची
भिजली वसुंधरा
भिजली वसुंधरा !!धृ!!

मेघ दाटले आभाळ फाटले
शेत शिवार फुलले
मयुर नर्तन कोकीळ गायन
रानोरानी घुमले

फड फड फड फड पंख भिजली
रान पाखरांची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोगंराची
भिजली वसुंधरा …!!१!!

नागमोडी वळण घेत निघे
सरिता पुढे
फेसाळत-ठेचाळत
दोन्ही किनाऱ्याकडे
खळ खळ खळ खळ नाद
भंगली शांती कातळांची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोगंराची
भिजली वसुंधरा …!!२!!

निळी पिवळी लाल केशरी
नाजूक या सुमनांनी
दिसती सुंदर इवल्या इवल्या
गवत फुलांनी
भर भर भर भर झबली घातली
रंगारंगाची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोंगराची
भिजली वसुंधरा …!!३!!

समीर संगे पिंगा घाली
वर्षा तरुभोवती
पर्णावर गोळा होती
पाणीदार मोती
सळ सळ सळ सळ मस्ती चालली पानांपानांची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोंगराची
भिजली वसुंधरा ….!!४!!

सप्तरंगी इंद्रधनुची कमान
क्षितीजी साजे
मेघराजाच्या अंबारीत
नववधू ही धरणी लाजे
हिरवा शालू शान वाढवी
या वसुंधरेची
झर झर झर झर झरा उतरला
वाट डोंगराची
भिजली वसुंधरा
भिजली वसुंधरा !!५!!

https://youtu.be/styWd9ZnxKk

– रचना : सुरेखा गावंडे, कल्याण(पूर्व)
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800

2 COMMENTS

  1. 🌹पाऊस आणि धरतीच एक अतूट नातं, आपण खूप सुंदर कविता केली आहे. 🌹
    🌹धन्यवाद सुरेखा गावंडे मॅडम 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version