Home साहित्य भैरवी

भैरवी

0

झाली वेळ आता
घ्यायचा आहे निरोप
गाऊनी सूर भैरवीचे
करावा मैफल समारोप

मन माझे दाटून येते
वळून मागे पाहताना
कसे होते ओलेते
आठवणी ओघळताना

किती वाटा तुडवल्या
झेलली वारे वादळे
किती खड्डे वाळवंटे
कधी मृगजळ आगळे

कधी रानसुमने ऊगवली
फुले काटे सारे वेचले
मोडले पण नाही वाकले
कडु गोड पार जाहले

कळेना मन का ओलावते
आता चंद्र आभाळीचा
ऊगा भासतो थकलेला
मार्ग मंद होतो ढगांचा

वेध लागले पलीकडचे
सोडून जाता जीवलगांना
पापणीतील थेंबानो
मिटून घ्या सूरांना

राधिका भांडारकर

– रचना : राधिका भांडारकर, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version