Home साहित्य महामानव

महामानव

2

जन्म ना आपुल्या हाती
कर्तृत्व ते असावे महान
सारी त्या देवाची लेकरे
कोणी नसे थोर वा सान 

गरिबा घरी झाला जन्म
त्याचा दोष असा काय
शिस्त कर्तव्य समजावी 
अशिक्षित त्याची माय 

तल्लक बुद्धी कष्ट अति
शिकण्याची हौस मोठी
भीमरावाने हाती घेतली
जिद्दीची बळकट काठी 

कष्ट स्वतःचेही सोसवेना
पाहवेना दुसऱ्याचे हाल
भीमा तळमळे रात्रंदिन
असे गेले कित्येक साल

पत्नीनेही दिली साथ खूप 
देह झिजविला कष्ट अपार 
सात्विक आणि सोशिक ती
आनंदाने पार पाडला संसार 

भीमास ओढ शिकण्याची 
बॅरिस्टरही होऊनी आला 
काहीही नव्हते बदललेले
वंचित गरिबीत पहुडलेला 

मानव भेदाभेद ना रुचला 
केला बौद्ध धर्माचा स्वीकार
घडविले परिवर्तन लोकात
केला जातिभेद अस्वीकार

उपदेश संघटित व्हा शिका 
संविधान आले कामी आता 
गोरगरीब स्त्रिया अस्पृश्य 
बाबासाहेब ते उद्धारकर्ता 

मिळाला महामानव मान 
जगी झाली किर्ती महान
भारतरत्न उपाधि देऊन
राष्ट्रानेही केला सन्मान 

— रचना : डॉ.सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. अभिनंदन अनुपमा !!! आजच्या डॉ. बाबासाहेबांच्या महानिर्वाणाचे औचित्य साधून खूप समर्पक शब्द रचना !!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version