Home यशकथा महाराष्ट्राचे हरियानात सेलिब्रेशन

महाराष्ट्राचे हरियानात सेलिब्रेशन

0

हरियानात सुरु असलेल्या “खेलो इंडिया” स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, सायकलिंग आदी संघांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी मैदान दुमदुमून जाते आहे. सांघिक विजेतेपदानंतर नाचून सेलिब्रेशन होते.

अँथलेटिक्समध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवल्यानंतर सेलिब्रेशन झाले. खेळाडूंसोबत, प्रशिक्षक यांच्यासोबत क्रीडा विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. जेतेपदाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन आनंदात प्रत्येकजण नाचत होता.

क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील, अँथलेटिक्सचे प्रशिक्षक महेश पाटील, जयकुमार टेंबरे, खेळाडू यांच्यासह पालकही डीजेच्या तालावर नाचत होते. हे अनोखे सेलिब्रेशन कौतुकाचा विषय ठरले होते. प्रत्येक सामन्यावेळी सहसंचालक कांबळे, मुख्य व्यवस्थापक पाटील यांच्यासह नेमलेले अधिकारी खेळाडूंचे मनोबल वाढवित आहेत.

यांनी गाजवले बारावीचे मैदान
आर्यन कदम (आयएससी पॅटर्न, औंध, पुणे) बारावीला आहे. त्याचे पहिले सत्र झाले आहे. त्यात त्याला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. काल बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतलेत.

कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्णपदक आणि २०० मीटरमध्येही त्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. पाटीलने घेतलेली उंच उडी रौप्य पदकापर्यंत पोचली आहे. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले.

मुलींच्या संघातील वैष्णवी कातुरे ही बारावी कॉमर्सला होती. तिने त्या मैदानावरही चांगलीच धाव घेतली. तिला ६८.३३ टक्के गुण मिळाले. रिया पाटील ही कॉम्प्युटर सायन्स करीत होती. तिला ७५.१७ टक्के गुण मिळाले. खेळात आणि शिक्षणातही या खेळाडूंनी नाव कमावले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version