Home बातम्या महिलांनो, उद्योजक व्हा !

महिलांनो, उद्योजक व्हा !

0

नगर येथील स्नायडर इंडिया प्रा.लि. कंपनीतील कामगारांच्या गृहिणी यांनी उद्योजकतेकडे वळावे, यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहामध्ये एका कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल लवंगे, मॅनेजर बालाजी बिराजदार, मार्गदर्शक प्रा.टी.पी.जिवडे, स्नायडर कंपनीचे अधिकारी आशितोष कोल्हटकर, महेश चांडक, अविनाश मांडे, श्रीकांत गाडे, कंपनीचे भारतीय कामगार युनियनचे अध्यक्ष मधुकर निकम, तसेच कामगार प्रतिनिधी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख श्रीकांत गाडे यांनी प्रास्तविक करुन महिलांनी उद्योजकता क्षेत्राकडे वळावे, या दृष्टीकोनातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून, आज महिला या अनेक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत असून, उद्योजकता या क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकावे, यशस्वीतेच्या वाटचाली बरोबर कुटूंबाचा आणखी विकास साधावा, अशी प्रामाणिक भावना स्नायडर कंपनीची आहे, असे सांगितले.

सहभागी महिलांनी उद्योजकता वाटचालीसाठी भविष्यात येणार्‍या अडीअडचणींचा उहापोह केला गेला.

महाव्यवस्थापक अतुल लवंगे यांनी बोलतांना राज्य व केंद्र शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी, कर्ज वितरणाविषयी व सबसिडी विषयी सविस्तर माहिती दिली. महिलांना उद्योजकता विकासासाठी मिळणारे कर्ज हे सेवा उद्योग व उत्पादन उद्योग अशा दोन वेगवेगळ्या विभागासाठी असून, अंदाजे 25 ते 50 लाखांचे कर्ज महिला उद्योजकांना मिळू शकते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत श्री.लवंगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. परंतु या फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही भामट्यांची आपण मदत घेऊ नका व त्यांच्याकडून आपली फसवणुक करुन घेऊ नका, असे असे आवाहन केले.

यावेळी अधिकारी महेश चांडक, आशितोष कोल्हटकर, अविनाश मांडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर निकम, बालाजी बिराजदार यांनी समयसूचित मार्गदर्शन केले.

दुसर्‍या सत्रामध्ये नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजिका भुपाली निसळ यांनी उपस्थित महिलांना या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी विश्वास संपादनता, सचोटी, वेळेचे पालन व गुणवत्ता या महत्वाच्या कशा बाबी आहेत, यात आपण कशा यशस्वी व्हाल, याबाबत माहिती दिली. मी एका कंपनीची मालकीण आहे. एका छोट्याशा भाड्याच्या जागेमधून आज मी स्वत:चे एक मोठे युनिट उभे केले. यामागे माझ्या निष्ठेबरोबरच माझ्या वडिलांचे मार्गदर्शन त्याचबरोबर एखादा कर्मचारी न आल्यास स्वत: कर्मचारी बनून मी वेळेचे बंधन न पाळता काम केले. त्यातूनच मी इतर उद्योजकांना वेळेवर काम देऊ शकले, हीच माझ्या यशस्वीतेमागील बाब आहे, असे सांगितले.

यावेळी सहभागी महिलांनी उद्योजकता वाटचालीत येणार्‍या अडीअडचणींचा उहापोह केला गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी रविंद्र भावसार यांनी आभार मानले.

– छाया : अनिल शाह
– टीम एनएसटी. 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version