Home यशकथा महिला उद्योजक परिषद यशस्वी

महिला उद्योजक परिषद यशस्वी

0

घर संसार, सासर-माहेर, नातीगोती या बरोबरच महिला व्यवसाय सुद्धा अतिशय चोखपणे सांभाळू शकतात. जेव्हा ती उभी राहते तेव्हा ती एक सक्षम रणरागिनी असते. आणखीन जोखीम स्वीकारून ती यशाची उंच शिखरे सहज चढू शकते, असे विचार जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपाताई पाटील-यड्रावकर यांनी बिझनेस एक्स्प्रेस श्री फौन्डेशन आणि आम्ही उद्योजिका यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या महिला उद्योजक राज्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष या नात्याने व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षाताई पाटोळे होत्या.

महिला उद्योजिका राज्य परिषदेच्या अध्यक्षा तथा जिजामाता कृषीभूषण पूजा सावंत यांनी आपल्या भाषणात महिलांनी स्वत:ची उर्जा, कौशल्य, शक्ती ओळखून त्याचा विकास करुन जीवनात यशस्वी बनले पाहिजे, चूक ओळखून त्याचा विकास करुन जीवनात यशस्वी बनले पाहिजे, चूल आणि मूल यातच अडकून न राहता त्यांनी स्वत:च्या क्षमतांचा विस्तार केला पाहिजे असे प्रतिपादन केले. एखाद्या उद्योगांचे त्यांनी लावलेले रोपटे हे त्यांच्याच परिश्रमाचे संजीवनी पुरस्कारातून शाबासकी मिळाली की ती नक्कीच मोठी प्रेरणा बनते.

जेष्ठ पत्रकार अशोक घोरपडे यांनी संपादित केलेल्या ‘नारी गौरवगाथा भाग-2’ चे पुस्तक स्वरुपाताई पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अशोक घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना मोहोळच्या डॉ. स्मिता पाटील म्हणाल्या, ज्या दिवशी महिला स्वत:चे निर्णय स्वत: घेतील त्या महिलांनी स्वत:च स्वत:च्या मार्गातील अडथळा बनू नये, तर नवनवीन विचारधारा स्वीकारून स्वत:ची प्रगती केली पाहिजे, असे आपल्या व्याख्यानातून पटवून दिले.

कडवई (रत्नागिरी) च्या तज्ञ डॉ. अनुराधा नारकर यांनी योगासनाचे काही प्रकार आणि महत्व विशद केले. त्यांनी हास्य योगाचे काही प्रकार उपस्थितांकडून करुन घेतले. त्यामुळे कार्यक्रमात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. प्रात्यक्षिकांसह त्यांच्या व्याख्यानाचा वेगळा प्रभाव पडला.

तडसरच्या कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दादासाहेब खोगरे यांनी महिलांसाठी अन्नप्रक्रिया मधून सुद्धा थोडक्यात भांडवल, जागा आणि मनुष्यबळाच्या जोरावर अनेक यशस्वी उद्योग केले जावू शकतात या बद्दल सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी रश्मी सावंत यांनी बहारदार स्वागतगीत सादर केले. गीतांजली थोरात यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. जहिदा मुजावर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जस्मिन शेख व वैष्णवी जाधव यांनी शानदारपणे केले.

या परिषदेत अमरावती, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि कोकण येथील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पुढील महिलांना ‘संजीवनी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

उद्योग क्षेत्र:-
भारती मनिष मोहोकर सप्तश्रुंगी मेडिकल्स, जि. अमरावती; अनुप्रिया अनंतकिर्ती चिमड, यश असोसिएट्स, कुपवाड; प्रियांका सुहास जामसांडेकर,
चेअरमन कोगनेरीस मिडीया कोल्हापूर; आशाताई अशोक डोर्ले मे. डोर्ले अ‍ॅन्ड सन्स, कोल्हापूर;
कल्पना सुनील चौगुले, धन्वंतरी महिला बचतगट शेडशाळ, जि. कोल्हापूर;

शैक्षणिक क्षेत्र:-
यास्मीन अल्ताफ हुसेन पठाण मुख्याध्यापिका, महात्मा गांधी विद्यालय, सांगली; आतिका बेगम शब्बीर जमादार प्र. मुख्याध्यापिका, म.न.पा. उर्दू स्कूल नं. 17 सांगली; जस्मिन रमजान शेख, सहाय्यक शिक्षिका राजाराम रंगलाल सारडा, सांगली; वैद्यकीय क्षेत्र:-
डॉ. तबस्सुम फैय्याज शिकलगार, मॉम हॉस्पिटल सांगली; डॉ. मुबीनआरा साहिल शेख, शेख हॉस्पिटल जयसिंगपूर जि. कोल्हापूर;

सामाजिक क्षेत्र:-
स्नेहलता सदाशिव पवार, जनहित सेवासंस्था हरीपूर जि. सांगली; मिनल गणपतराव उर्फ दादासाहेब साठे, नगराध्यक्षा माढा जि. सोलापूर; पुष्पलता बाबासाहेब पाटील, माजी नगरसेविका सांगली; रेखाताई प्रदीप दुबिले, पोलीस पाटील खंबाळे, ता. कडेगाव जि. सांगली;

सामाजिक व साहित्य क्षेत्र:-
अंजली सत्यपाल श्रीवास्तव, करमाळा जि. सोलापूर;

प्रशासकीय सेवाक्षेत्र:-
ऋतुजा भरत धुमाळ, डेप्यु. मॅनेजर, शापुर्जी पल्लोनजी प्रा. लि., जि. पुणे; सुजाता आनंदराव वंजारी. तलाठी, इटकरी जि. सांगली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version