Home साहित्य माणूस नि पाऊस

माणूस नि पाऊस

1

पाहतात वाट डोळे लावून माणसाची,
पाहतात आतुरतेने वाट पावसाची

भरते घर येणाऱ्या माणसाने,
बहरते पृथ्वी कोसळणाऱ्या पावसाने

घराचा कर्ता करविता माणूस,
पृथ्वीचा सुफलाम जनक पाऊस

सामंजस्य वृत्ती आनंदी माणसाची,
रिमझिम सरीत शोभा पावसाची

अंथरावी सुखे वैचारिक माणसाने,
फुलवावा निसर्ग मध्यम पावसाने

राखावा चढउतार संसारी माणसाने,
करावी भरतीओहोटी समुद्री पावसाने

विखरते घरकुल व्यसनी माणसाने,
कोलमडते जनजीवन मुसळधार पावसाने

विस्कटते घरकुल विक्षिप्त माणसाने,
बुडते धरती वादळी पावसाने

माणूस नि पाऊस साम्य दोघांचे,
असावेत दोघे इच्छाधारी स्वभावाचे

पावसाच्या खेळात मानवी जीवन,
दुर्भाग्य माणसास दुष्काळी कारण

वर्षा भाबल.

– रचना – सौ. वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version