Home साहित्य मुलगी म्हणजे…..

मुलगी म्हणजे…..

0

मुलगी म्हणजे, सोनेरी पहाट
गंगेचा जसा पवित्र घाट.

मुलगी म्हणजे, निरागस बालपण
तिच्यामुळे लाभते घराला घरपण

मुलगी म्हणजे, भाग्याचे क्षण
पूर्व जन्माच्या पुण्याचे लक्षण

मुलगी म्हणजे, आनंदाची शिदोरी
तिचे अस्तित्व जणू संपत्तीची तिजोरी

मुलगी म्हणजे, अतूट विश्वास
आई वडिलांच्या जगण्याचा श्वास

मुलगी म्हणजे, चैतन्याचे प्रतीक
जपते सर्वांच्या मनाचे गुपित

मुलगी म्हणजे, नदीतील नाव
ओळखते आपले अदृश्य गाव

मुलगी म्हणजे, भावनांचा ओलावा
प्रेमाने जपते हा जिव्हाळा

मुलगी म्हणजे, आईची मैत्रीण
नात्यांना जोडणारी अदृश्य वीण

मुलगी म्हणजे, सप्तरंगी सूर
अनमोल अशा आठवणींची काहूर

मुलगी म्हणजे, इवलेसे पाखरू
उडण्या आधी तिला सावरू, तिला जपू..

मुलगी म्हणजे, सुखाचा हेवा
तेवत राहो अखंड हा दिवा

मुलगी म्हणजे, मायेचा कळस
जशी विठठलाची प्रिय तुळस

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version