Home साहित्य मेघ नभात दाटले…

मेघ नभात दाटले…

2

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!

घाट पाषाणास फुटे पान्हा,
वाहती त्यातुनी जलधारा,
मिळे ओलावा तो मायेचा,
म‌ऊ धुक्यात हर्ष गारवा ||१||

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले!!धृ!!

होई पाषाणं म‌ऊ गालीचे,
सुंदर मखमलीचे हिरवाईचे,
हरित तृणाचे वेल ,
जल शिंपण धवल फुलांचे ||२||

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले!!धृ!!

भरजरी हिरवा शेला नवा,
आज पांघरला धरतीवरी,
जणू दिसे वधू परी आज,
गंध प्रमेचा लावी भाळावरी ||३||

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!

मेघ सावळा माझा धनी,
येतो नाचत रानी, वनी,
हर्ष भरीत तो मनामधी,
नवचैतन्य येई आज मनी ||४||

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !! धृ!!

थेंब थेंब पाणी मातीत जिरव
अंकुर सोनियाचा येई बाहेर,
येई हिरवी त्यास पालवी,
शिवरात शोभे तुरा दानेदार ||५||

मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!

प्रविण खोलंबे

– रचना :  प्रविण खोलंबे. मुरबाड, जि.ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. मेघ नभात दाटले श्रीयुत प्रविणजींची मनमोहक निर्व्याज देहादेहातील निसर्गावलोकन ही रचना भावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version