Home कला रागसुरभी ( 24 )

रागसुरभी ( 24 )

0

राग हिंडोल
राग हिंडोल हा एक प्राचीन राग आहे ज्याचा उल्लेख सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. भरत आणि हनुमान यांच्‍या मते, हा राग-रागिणी पद्धतीतील मुख्य 6 रागांपैकी एक आहे.

राग हिंडोल किंवा राग हिंदोलचा उगम कल्याण थाटातून झाला असे मानले जाते. या रागामध्ये मध्यम तीव्र आहे आणि निषाद आणि गंधार कोमल आहेत. ऋषभ आणि पंचम निषिद्ध आहेत. त्याची जात ओडव-ओडव आणि वादी-धैवत आणि संवादी-गांधार आहे. गाण्याची वेळ सकाळची आहे.

या स्वरात शुद्ध निषाद, ऋषभ आणि पंचम वर्ज्य आहेत. तीव्र मध्यम असलेला हा एकमेव राग आहे जो सकाळी गायला जातो. इतर सर्व तीव्र मध्यम रागांची गाण्याची वेळ रात्रीची असते.

राग हिंडोलमध्ये निषादला फार कमी महत्त्व दिलेले आहे. कारण म ध नि सा पासून सोहनी आणि सां नि, ध म घेतल्याने त्यात पुरिया रागाची सावली पडते. या रागात जेव्हा सां ध असे स्वर येतात, तेव्हा मधला निषाद धैवतात जोडला जातो, तर सां वरून ध स्वरात येतो.

हा उत्तररंग प्रधान राग आहे. त्यामुळे त्याचा कल मध्य सप्तकच्या उत्तरांग किंवा तार सप्तकाकडे अधिक आहे. हिंदोळ हा गंभीर स्वरूपाचा राग आहे, म्हणून तो धृपदासाठी अधिक योग्य आहे.

राग थेरपीमध्ये हा राग सांधेदुखीवर फायदेशीर मानला जातो.

हा राग दिवसाच्या पहिल्या भागात वीणा, सतार, सेहनाई, बासरी इत्यादी वाद्यांवर गायला जावा किंवा वाजवावा.

थाट : कल्याण
राग हिंदोल मधील चित्रपट गीत
1) कही दीप जले कहीं दिल
2) कुहू कुहू बोले कोयलिया

प्रिया मोडक

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version