Home कला रागसुरभी ( 31 )

रागसुरभी ( 31 )

1

राग जोगिया
जोगिया हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा भैरव थाटावर आधारित आहे. हा दिवसाच्या पहिल्या प्रहराला, पहाटेच्या वेळी (ब्रह्म मुहूर्त) गायला जातो. जोगिया हे नाव जोगीवरून आले, जो योगींचा अपभ्रंश आहे. म्हणून या रागाला जोगी असेही म्हणतात. या रागाची भक्ती आणि अलिप्तता ही वैशिष्ठ्ये आहेत. ठुमरीसाठी हा राग योग्य आहे.

या रागात रिषभ, कोमल धैवत आणि उरलेले स्वर शुद्ध आहेत. आरोहात गंधार, निषाद आणि अवरोहात केवळ गंधार वर्ज्य आहे. या रागाची जाती ओडव-षाडव अशी असून वादी स्वर मध्यम आणि संवादी स्वर षड्ज आहे.

राग भैरव प्रमाणेच ऋषभ आणि धैवत यात मृदू आहेत, पण ते लावण्याची पद्धत वेगळी आहे. राग भैरवमध्ये ऋषभ आणि धैवत हे आंदोलित आहेत, तेच आंदोलन जोगियामध्ये कधीही केले जात नाही. हा राग मध्य आणि तार सप्तकांमध्ये विस्तारणीय आहे.

हा राग एक जड वातावरण निर्माण करतो, तथापि तो ठुमरी, भजन आणि दादरा इत्यादींसाठी योग्य आहे.

राग जोगियावर आधारित गाणी
1) दिल एक मंदिर है चित्रपट – दिल एक मंदिर है
२) कह दो कोई ना करे यहाँ प्यार – गूंज उठी शहनाई
3) रात भर का है मेहमान – सोने की चिड़िया
४) आये ना बालम – स्वामी
5) दुआ करे गम-ए-दिल – अनारकली
6) तुम मोरी राखो लाज हरी – देख कबीरा रोया
7) उठ तो चले अवधूत – जोगन
8) मेरा दर्द न जाने कोई – जोगन
9) ओ गंगा मैया – चंदन का पालना
10) आये न बालम वादा कर के – शबाब
11) हे नटराज गँगाधर शम्भो भोलेनाथ, जय हो – संगीत सम्राट तानसेन

राग जोगियावर आधारित मराठी गाणी
1) नकोरे जाऊ रामराया – गीत रामायण
2) वद जाऊ कुणाला शरण – संगीत सौभद्र
3) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल – मराठी गाणे
4) परक्याचे धन कन्या – मराठी गाणे
5) माझ्या मनीचे हितगुज सारे – मराठी गाणे
6) पैल तो गे काऊ कोकताहे – मराठी गाणे
7) भेटीलागीं जीवा लागलीसे आस – मराठी गाणे

प्रिया मोडक

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. राग जोगिया…सुंदर माहिती आणि आधारित गीतांचे संकलन.
    यामुळे राग समजायला सोपा जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version