Home कला ‘राग सुरभी’ ( ७ )

‘राग सुरभी’ ( ७ )

1

दुर्गा राग
दुर्गा हे नाव अंबा किंवा पार्वतीच्या नावावरून पडले आहे. ती शिवाची पत्नी आहे आणि महान शक्ती आहे. तिला ‘माता दुर्गा’ असेही संबोधले जाते. ती संयम आणि निर्भयता दर्शवते. हा राग दक्षिण भारतीय शुध्द सावेरी वरून आला आहे.

जरी मूळचा दुर्गा राग दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतातील असला, तरी हा राग हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शैलीसाठी तितकाच योग्य आहे. दुर्गा रागाचे तेज, निरागसता आणि शुद्धता हे गुण आहेत. ते नेहमी डोंगरांची आठवण करून देते. या रागासाठी पारंपारिकपणे निर्धारित केलेली वेळ संध्याकाळची आहे परंतु, हा एक असा राग आहे जो दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि संथ आणि चैतन्यशील दोन्ही प्रकारांना गाईला जातो. या रागात ख्याल आणि बंदिश अतिशय छान रचले गेले आहेत आणि लोक सहजपणे या मधुर रचनांवर डोलतात आणि नाचतात. राग दुर्गा तणावमुक्त होण्यास मदत करू शकते. राग दुर्गा शुद्धता आणि पावित्र्यतेने भरलेला आहे.

राग औडव :-  औडव स्वरूपाचा आहे, वापरलेले सर्व स्वर शुध्द आहेत. गंधार आणि निषाद वापरलेले नाहीत. हा एक पूर्वरंग-प्रधान राग आहे ज्यामध्ये सप्तकाच्या खालचे स्वर अधिक वारंवार वापरले जातात.

थाट : बिलावल

वेळ : रात्रीचा दुसरा प्रहार (संध्याकाळी ६ ते रात्री ९)

दुर्गा रागावर आधारित गाणी :- 

1. गीत गाया पत्थरों ने – गीत गया पथरों ने
2. चंदा रे मोरी पतिया लेजा – बंजारीन
3. दूर देश का – जवाब
4. हम इंतजार करेंगे – बहू बेगम
5. तू इस तरह से मेरी जिंदगी – आप तो ऐसा ना थे
6. ऐ बाद ए सबा आहिस्ता चल -चित्रपट : अनारकली (1953)
7. जानेवाले ओ मेरे प्यार – चित्रपट : गीत गाया पत्थरों ने (१९६४)
8. सासों के तार पर – चित्रपट : गीत गाया पत्थरों ने (1964)
९. झुकती घटा गाती हवा – चित्रपट : धूल का फूल (1959)
10. ओ दूर के मुसाफिर -चित्रपट : उड़न खटोला (1955)
11. सावन का महीना पवन करे सोर-फिल्म : मिलन (1967)
12. कर हा करी धरिला शुभांगी – राग दुर्गावर आधारित मराठी नाट्यगीत
13. केव्हातरी पहाटे उलटून (मराठी)
14. केशवा माधव तुझ्या नामात रे (मराठी)
15. चंद्रिका ही जणु (नाट्यसंगीत मराठी)
क्रमशः

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version