Home बातम्या राष्ट्रपतींचा वाढदिवस : मदन लाठी यांचे ७६वे रक्तदान

राष्ट्रपतींचा वाढदिवस : मदन लाठी यांचे ७६वे रक्तदान

3

परिचित, अपरिचित यांना वाढदिवसाच्या, पदोन्नतीच्या शुभेच्छा देऊन, अडी अडचणीत सापडलेल्याना शक्य होईल ती मदत करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडणारे पुणे येथील (मूळ जळगाव निवासी) आनंदयात्री मदन लाठी यांनी आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्ताने, रविवार रोजी ३ ऑक्टोबर रोजी, ७६ वें रक्तदान अंकुशराव लांडगे सभागृहात केले.

खरं म्हणजे हे रक्तदान त्यांना राष्ट्रपतींच्या वाढदिवशी म्हणजे १ ऑक्टोबर रोजीच करावयाचे होते. पण मागील रक्तदान त्यानी ४ जुलै रोजी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ४ जुलै रोजी केलेले होते व २ रक्तदानात ३ महिन्याचे अंतर हवे असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे त्यांनी ते १ ऑक्टोबर रोजी न करता ३ ऑक्टोबर रोजी केले. श्री लाठी यांच्या या रक्तदानाबद्दल राष्ट्रपतीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री लाठी यांनी पहिले रक्तदान महाविद्यालयात असताना केले होते. त्यानंतर रक्तदानाचे महत्व, गरज ओळखून ते वेळोवेळी रक्तदान करीत आले आहेत.
रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी श्री लाठी सतत प्रयत्न करीत असतात.

फ्रीज भेट
गरीब वृद्धांसाठी मोफत असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला मागच्याच महिन्यात श्री लाठी यांनी फ्रीज भेट दिला होता.
– देवेंद्र भुजबळ 9869484800

3 COMMENTS

  1. आदरणीय लाठी साहेब, आपण खूप छान काम करीत आहात. आपले मनःपूर्वक अभिनंदन…

  2. आदरणीय श्री मदन लाठी यांनी शहात्तर वेळेस रक्तदान करून नवा उच्चांक गाठला आहे. समर्पित भावनेने ते नियमितपणे रक्तदान करून समाजऋण फेडण्याचा चांगला उपक्रम पार पाडीत आहे. श्री. मदन लाठी सरांचे मनःपूर्वक अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version