Home कला “रेषांमधली भाषा” : २२

“रेषांमधली भाषा” : २२

1

चांदवा

मंडळी,
“Girl with a Pearl Earring” हे योहान्स व्हरमीयरचं चित्र केवळ एक पोर्ट्रेट नाही, तर एक tronie चित्र प्रकार आहे ज्यात प्रत्यक्ष व्यक्ती नव्हे, तर आदर्श, काल्पनिक व्यक्तिरेखेचं भावमुद्रात्मक चित्रण केलं जातं.

या चित्रातील तरुणीला “Monalisa of the North” असंही संबोधलं जातं, कारण तिच्या डोळ्यांतून आणि ओठांवरून झळकणारी एक अस्पष्ट भावना मोनालिसा प्रमाणे चित्रप्रेमींना तिच्या आत डोकावण्याचा मोह पाडते.

मात्र, हे चित्र केवळ एका स्त्रीचं सौंदर्य मांडत नाही — ते १७ व्या शतकातील डच समाजातील सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडींचंही प्रतीक आहे. व्हरमीयर ज्या काळात चित्र काढत होता, तो Baroque शैलीचा उत्कर्षकाळ होता, ज्या शैलीत प्रकाश आणि सावली, मौन आणि नाट्य यांचा एक मिलाफ दिसत असे.

त्या मुलीच्या पोशाखातील पूर्वेकडचा पोत (oriental attire) आणि डोक्यावर लपेटलेलं कापड हे त्या काळातील डच वसाहती व आशियाई व्यापारी संबंधांतून आलेल्या प्रभावाचं निदर्शन घडवतं.

तिच्या कानात झळकणारा मोती केवळ सौंदर्याचा अलंकार नाही, तर डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जागतिक व्यापारातून आलेल्या संपत्तीचं आणि सत्तेचं प्रतीक आहे. त्या झळाळीत वैभवही आहे आणि सामर्थ्याचं अधिष्ठानही आपल्याला बघायला मिळतं. ही कविता — “चांदवा” — त्या मौनचित्राशी साधलेला एक तरल, पण खोल संवाद आहे.

यूट्यूब चॅनलची लिंक 👇 खाली देत आहे.

मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

शैलेश देशपांडे

लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. Khup sunder kavita.shabda chan gumphalet tumhi Shailesh ji . Abhinandan aani khup shubhecha🤝💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version