“अधोगत”
मंडळी, काही चित्रांमध्ये फक्त रंग आणि रेषाच नसतात; तर त्यात असते ती नजरेतून खाली झेप घ्यायला लावणारी वृत्ती… वासिली कांडिंस्की यांच्या “Downwards” (1929) या चित्रात अशीच एक स्पष्ट गती — किंबहुना अधोगती — अनुभवता येते.
उदाहरणार्थ, क्रिकेटची पंढरी, Lords Cricket Ground ला असणारा slope – जो दिसत नाही, पण अनुभवल्या शिवाय कळतही नाही. Downwards या चित्रातदेखील अशीच अनेक अधोमुख प्रवाहांची संगती आहे – जिचा अनुभव घेता येतो, पण जी शब्दात पकडणं अवघड.
ह्या चित्रात एक लांबट, बारीक आकृती आहे – जणू एखादी बासरी. काही रचना पायऱ्यांसारख्या टप्प्याटप्प्याने खाली उतरतात. तर काही ठळक, आडव्या-तिरक्या सीमारेषा, जणू त्या आकृत्यांना चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतात.
या अमूर्त चित्रात मला जाणवली ती अधोगती – वाळूसारखं ओघळणारं आयुष्य, बासरीसारखं पोखरलेलं मन, आणि पायवाटांमधून निसटलेली स्वप्नं… हे सर्व त्या चित्रात होतं मी फक्त त्याला शब्द दिले
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल.
कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
