Home बातम्या “अंतर्मनीचे भाव तरंग” प्रकाशित

“अंतर्मनीचे भाव तरंग” प्रकाशित

0

आपल्या पोर्टलचे नियमित लेखक, कवी, निवृत्त बँक व्यवस्थापक बाबू डिसोजा यांच्या “अंतर्मनीचे भाव तरंग” या प्रथम ई- बुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच एका घरगुती कार्यक्रमात झाले.

या कार्यक्रमाचे निमित्त होते, त्यांच्या लग्नाचा ४४ वा वाढदिवस. यावेळी. त्यांची पत्नी सौ.माधुरी, मुले डॉ.अभिनंदन, स्नुषा उद्योजिका सौ. सुप्रिया, डॉ.साईप्रसाद, इंजि.सौ.पूजा, नातवंडे कु.हेरंब, कु.इरा उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी या पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त केले. तर श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष श्री संतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या.

या काव्यसंग्रहास साहित्यिक अरूण देशपांडे यांची प्रस्तावना लाभली असून कोल्हापूर येथील मेघा शहा यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

विशेष म्हणजे बाबू डिसोझा यांची तब्येत ठीक नसते. त्यांना डायलिसिस घ्यावा लागत असतो. तरीही ते जिद्दीने लेखन करीत असतात, ही बाब फारच कौतुकास्पद आहे. न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे श्री बाबू डिसोझा यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version