Home साहित्य ‘लालबत्ती’ ( ३२ )

‘लालबत्ती’ ( ३२ )

0

बानो त्या हॉस्पिटल मधून पळ काढून कशीबशी रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचली होती. तेंव्हा त्यांच्या तावडीतून सुटल्याचा आनंद आता ही तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. बानो पुढे म्हणाली, “आती जाती रेल देखते देखते थोडी देर ही हुई थी. एक बुढी दादि मेरे पास आकर मेरे गाव के पास वाले शहर का नाम लेकर पुछने लगी, “कहा जाना है ? बाहर सामान की गाडी खडी हैं. कम पैसे मे पहोचा देगी”.

कम क्या मेरे पास तो पैसे थे ही नहीं. उस दादि को मैने बता दिया था मेरे पास पैसे नही हैं. उसने कहा उसका सामान गाडी मे रखना और उतारना होगा फिर वो ले जायेगी मुझे. मेरी हालत ठिक नहीं थी. बहोत कमजोर हो गयी थी मैं. लेकीन जल्दी बाहर निकलना था यहा से.

मैने उस दादी का सामान उठाकर गाडी मे रखा और पीछे बैठ गई. चक्कर से आ रहे थे कब निंद लगी पता ही नही चला. गाडी रुकी तो दादी ने आवाज लगाई. मैं हडबडाकर उठी. शाम हो गयी थी. गाडी से नीचे उतरी तो पता चला किसी पुरानी बस्ती मे थी मैं. कौन्सा शहर था पता नहीं. बुढी दादी ने मुझे नीचे उतरने को कहा. दादी का सामान लेकर मैं नींचे उतरी.

बानो बोलता बोलता थांबली आणि माझ्याकडे बघून मला समोर बघण्यास सांगितलं. मी समोर बघितलं तर, वस्ती मधून काही महिला पळत सुटल्या होत्या आणि मिळेल त्या गल्लीत लपत होत्या. पोलिसांची रेड पडली होती. म्हणून त्या अश्या मार्ग मिळेल तिकडे पळत होत्या. आम्ही दोघी उठणारच एवढ्यात रूपा आपली दोन वर्षाची मुलगी चीमु हिला घेऊन धावत आमच्याकडे आली आणि चीमुला बानो च्या हातात देत म्हणाली, “चिमुला बघ दिदी मी येते संध्याकाळी”. माझा हात धरून मला म्हणाली, “ताई बघा आमची अशी गती असते इथे. लेकरू घेऊन कुठं पळायचं”. मी नेहेमी प्रमाणे निशब्द होते. मी तिला डोळ्यांनी धीर दिला आणि ती पळत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निघून गेली.

बानो च्या कडेवरून चीमू आपल्या आईला बघत होती. पण ती रडली नाही. कदाचित तिला सवय होती या सगळ्या गोष्टींची. बानो ने समोरच्या दुकानातून तिला बिस्कीट चा पुडा आणला आणि आपल्या शेजारी घेऊन बसली. चीमु गपगुमान बिस्कीट खात होती. बानो तिच्या कडे बघत म्हणाली, “दिदी रूपा का फारम भी भर दो. चीमू को कही भेज देना. इसकी मां मर गयी किसी दिन तो बेच देगा कोई इसको”. असं म्हणत तिने चीमुला जवळ घेतलं आणि शून्यात बघू लागली……
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version