Home साहित्य वरूणराजा

वरूणराजा

0

स्वरचित नवाक्षरी काव्यरचना

झळा उन्हाच्या सोसताना
तप्त धरणी व्याकुळली
बरसू दे पाऊस धारा
मिलनासाठी आसुसली….१

बळीराजाची विनवणी
नभाकडे लावून दृष्टी
जून मास संपत आला
होऊ दे मेघराजा वृष्टी…….२

अंगाची होते लाही लाही
सोसाट्याचा वादळ वारा
सांग वरूणराजा
कधी कोसळतील पाऊसधारा…३

मानवाची करूण व्यथा
ये रे ये रे पावसा साद
साऱ्या चराचरात घुमू दे
रिमझिमत्या सरींचा नाद…४

निसर्गाची हाक तुजला
आतुरलेली वसुंधरा
सप्तरंगी कमानीतून
ये भेटायला पयोधरा…….५

वर्षा मुसळे

– रचना : सौ.वर्षा मुसळे. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version